
स्पेनने दिग्गज उरुग्वे संघाचा चांगलाच गेम केला. फक्त एका गोलमुळे उरुग्वेच्या संघाला वर्ल्ड कपच्या बाहेर जाण्याची वेळ आली. पहिल्या सत्रात अॅलेक्स बाएनाने स्पेनसाठी गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. बाएनाने सामन्याच्या 42व्या मिनिटाला गोल केला. स्पेनची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली आणि बाएनाचा गोल निर्णायक ठरला.



























































