
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दुबईत एका वाहिनीला मुलाखत देताना हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटे आरोप केले असून त्यांच्या विरोधात बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पंढरपुरातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भोसले आणि शेखर जोशी यांनी पंढरपूर पोलिसांत केली आहे.
राहुल गांधी यांच्यामुळे माझ्यासह देशातील अनेकांना मानसिक क्लेश झाला आहे. त्यामुळे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून या गुह्याची जलदगतीने चौकशी करून राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यांनी केली आहे. दरम्यान, हा अर्ज प्राप्त होताच कायद्याचा अभ्यास करून योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती पंढरपूरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली.





























































