पंधराव्या वित्त आयोगाला केंद्राकडून मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र आणि राज्य सरकारांतून मिळणारा वाटा व त्यासाठीचे स्रोत ठरवणाऱ्या 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाला 1 वर्षासाठी 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. या वित्त आयोगाची मुदत खरे तर ऑक्टोबर 2019 मध्येच संपत होती, पण त्याला याआधी 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती ती 30 नोव्हेंबरला संपणार आहे. या आयोगाला 2021-22 ते 2025-26 च्या आर्थिक वर्षांसाठी करनिर्धारणाबाबतच्या आपल्या शिफारशी केंद्राकडे सादर करायच्या आहेत.