घरात असलेल्या रहस्यमय विहिरीचा लागला शोध, सापडल्या 500 वर्षांपू्र्वीच्या पुरातन वस्तू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडमधील प्लायमाउथ येथे राहणाऱ्या एका व्यक्तिच्या घरात रहस्यमय शोध लागला आहे. येथील एका व्यक्तीच्या घरात केलेल्या खोदकामात 17 फूट खोल विहीर सापडली असून या विहिरीत तलवार, नाणी, अंगठी अशा पुरातन वस्तू सापडल्या आहेत.

इंग्लंडमधील प्लायमाउथ येथे कॉलिन स्टीयर (70) यांचे घर आहे. 10 वर्षांपूर्वी घराचे सुशोभिकरण करत असताना त्यांना या विहिरीचा शोध लागला. ही विहिर 17 फूट खोल असून त्यामध्ये त्यांना तलवारी, अंगठ्या, नाणी अशा काही पुरातन वस्तूही सापडल्या आहेत. या सर्व वस्तू 500 वर्षांपूर्वीच्या असल्याचे कॉलिन स्टीयर यांचे म्हणणे आहे.

कॉलिन स्टीयर या रहस्यमय विहिरीविषयी सांगतात, ज्या घरात विहिरीचा शोध लागला ती विहीर 1895 सालात बांधली गेली आहे. कॉलिन त्या घरात 1988 सालापासून राहात आहेत. ते म्हणतात की, 10 वर्षांपूर्वी आम्ही घराच्या सुशोभिकरणाचे काम करत होतो. तेव्हा मी पाहिले की, खिडकीजवळ एक फरशी अडकलेली आहे. फरशी पाहिल्यावर कोणालातरी याच्या खाली दफन करण्यात आले असेल किंवा येथे सिंकहोल असेल, असे मला वाटले. असा विचार मनात आल्यावर त्यांनी या जागी खोदकाम करायचे ठरवले.

त्याप्रमाणे एक दशक म्हणजे 10 वर्षे त्यांच्या घरात असलेल्या या 17 फूट खोल विहिरीचे खोदकाम सुरू होते.  ही विहीर चार ते पाच फूट रुंद असून जेव्हा तिचे खोदकाम सुरू होते तेव्हा त्यामध्ये त्यांना 1725 सालातलं एक जुनं नाणं सापडलं. 5 फुटांवर खोदकाम सुरू होतं तेव्हा 500 वर्षे जुनी तलवार सापडली. त्यानंतर एक अंगठीही सापडली. 17 फूटांवर खोदकाम करताना विहिरीला पाणी लागले. 4 फूट पाणी या विहिरीच्या तळाशी आहे. आश्चर्य म्हणजे हे पाणी अत्यंत चवदार आहे, असे ते सांगतात.

विहिरीविषयी ही माहिती दिल्यानंतर ते पुढे म्हणाले की, ‘या विहिरीतील पाण्यात असलेल्या जिवाणुंची चाचणीही करून घेण्याचे मी ठरवले आहे, कारण हे पाणी बाटलीत भरून ते विकण्याचा व्यवसाय करता येईल.’