शेतकऱयांना दहशतवादी म्हणाली, कंगनाविरुद्ध कर्नाटकात गुन्हा

केंद्र सरकारच्या कृषि विधेयकाविरुद्ध आंदोलन करणाऱया शेतकऱयांना ‘दहशतवादी’ म्हणून संबोधणाऱया अभिनेत्री कंगना रानावत हिच्याविरुद्ध कर्नाटकच्या तुमकर जेएमएफसी न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 44, 108, 153, 153 अ आणि 504 अन्वये कंगनाकिरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 20 सप्टेंबर रोजी कंगनाने ट्विटरवर एक पोस्ट टाकली होती. त्यात ‘प्रधानमंत्रीजी, कुणी झोपले असेल तर त्याला जागे केले जाऊ शकते. जो झोपण्याचे नाटक करतोय, समजत नसल्याचे नाटक करतोय त्याला तुम्ही समजावूनही काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहेत,’ असे कंगनाने लिहिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या