‘ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपट दिग्दर्शकाच्या वडिलांविरोधात गुन्हा

18

सामना ऑनलाईन । बीड

‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विजय गुट्टे यांचे वडील रत्नाकर गुट्टे यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्दर्शक विजय गुट्टे यांची आई सुदामती गुट्टे यांनीच परळी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी सुदामती यांनी पती रत्नाकर गुट्टे यांच्यावर मारहाण करणे, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे, तसेच प्रॉपर्टी नावावर करून घेण्यासाठी धमकावत असल्याचे आरोप केले आहेत. परळी शहर पोलिसांनी या प्रकरणी रत्नाकर गुट्टे यांच्यासह 8 जणांविरोधात कलम 498 अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या