लोअर परळमधील सन मिल कंपाऊंडमध्ये आग, पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोअर परळ येथील सन मिल कंपाऊंडमधील एका गाळ्याला आज सकाळी पावणेआठच्या सुमारास भीषण आग लागली. या गाळ्यात कपडय़ांचा साठा असल्याने ही आग पसरली. ही आग इतकी भीषण होती की तब्बल पाच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

सन मिल कंपाऊंडमधील तळ अधिक एक मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कपडय़ांच्या साठय़ाने अचानक पेट घेतला. कपडय़ांमुळे आगीची तीव्रता वाढली. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 4 गाडय़ा, 3 जंबो टँकर्स, 1 क्विक रिस्पॉन्स व्हेईकल आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच पालिकेच्या स्थानिक वॉर्डचे कर्मचारीही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. अखेर पाच तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी 12ः14 वाजता ही आग पूर्णपणे विझवण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशामक दलाने दिली.