विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला आग, साडेतीन लाखांची रक्कम जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

मलकापूर स्थित अंबिकानगर येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागल्याने तब्बल साडेतीन लाख रूपये जळून खाक झाले आहेत. तर काही महत्त्वाचे दस्ताऐवजही जळाल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसात मलकापूरातील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या अंबिकानगर शाखेत बँकेचे दैनंदिन कामकाज सुरू होते. सर्वकाही नेहमी प्रमाणे सुरू असताना दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास अचानाक आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे बँकेत एकच खळबळ उडाली. बँक अधिकाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाची संपर्क साधला. अग्निशमन विभागाच्या दलाने तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्यास सुरुवात केली. बाहेरून आग कमी दिसत असली, तरी आतुन मात्र आगीचे स्वरुप भीषण होते. अग्निशमन विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली; मात्र आगीत तब्बल साडेतीन लाख रूपयांची रोख रक्कम जळून खाक झाली.