शेणापासून बनवल्या मजबूत फायरप्रूफ विटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणातील रायपूरच्या एका कल्पक बांधकाम उद्योजकाने गाई आणि बैलाच्या शेणापासून फायरप्रूफ विटा बनवल्या आहेत. या विटांना गोक्रीट असे म्हटले आहे. त्या घरातील तापमान कोणत्याही वातावरणात स्थिर ठेवतात.

या विटांमध्ये 80 टक्के शेण, चुना, माती, लिंबाचा रस आणि अन्य पदार्थांचे मिश्रण वापरण्यात आले आहे. रोहतकचे रसायनशास्त्रज्ञ डॉ. शिव दर्शन मलिक यांच्या संशोधनातून या विटा तयार झाल्या आहेत. रायपूर नगर निगम संचालित पहल सेवा समितीने या स्वदेशी ब्रॅण्डच्या विटांचा प्रसार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

शेणापासून बनलेल्या या विटांचे उत्पादन आता हरयाणा, राजस्थान, छत्तीसगढ, दिल्ली, तामीळनाडू, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या राज्यांतही सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या विटा मजबुतीसाठी वीटभट्टीत भाजाव्या लागत नाहीत.

त्या 12 दिवस वाळवल्या की, वापरासाठी तयार होतात. शिवाय 350 डिग्री सेन्टिग्रेड इतक्या उच्च तापमानाचाही या विटांवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे या विटांनी बनवलेले घर फायरप्रूफ बनते असा उत्पादकांचा दावा आहे.