‘छपाक’मध्ये अशी दिसतेय दीपिका, पोस्टरवरचा लूक प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
आज 5 जानेवारी म्हणजे बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पदुकोण हिचा वाढदिवस. या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या काही गाजलेल्या भूमिकांविषयी

सामना ऑनलाईन । मुंबई

आगामी ‘छपाक’ या चित्रपटाचं एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या पोस्टरवर दीपिकाचा अॅसिड हल्ल्यानंतरच्या लूकमधला फोटो दिसत आहे. या फोटोत दीपिकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि आशा अशा मिश्र भावना दिसून येत आहेत.

deepika-chhapak

मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटातून अॅसिड हल्ल्याच्या पीडित तरुणींच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा लक्ष्मी अग्रवाल या तरुणीच्या वास्तव जीवनावर आधारित आहे. लक्ष्मी अग्रवाल ही अॅसिड हल्ल्याची पीडिता आहे. निराशेच्या गर्तेतून सावरत लक्ष्मी स्वतःच्या पायांवर उभी राहिली आहे आणि अशा पीडितांसाठी आज काम करत आहे. तिच्या आयुष्याचा हा प्रवास छपाकमधून सांगण्यात येणार आहे.

या चित्रपटातील दीपिकाच्या व्यक्तिरेखेचं नाव मालती असं असणार आहे. यात तिच्यासोबत विक्रांत मेसी हाही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ‘छपाक’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.