ऑनलाईन सेल नव्हे फसवणूक; ग्राहक संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या बंपर सेल सुरू आहे. या सेलची मोठ्या प्रमाणात जाहिरातही करण्यात आली होती. तसेच या सेलमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर आणि सूट देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या सेलमधून फसवणूक होत असल्याचे सांगत अनेक ग्राहकांनी याविरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत. अनेकांनी आपली खरेदीची ऑर्डर रद्द केली आहे. तर आपण मागवलेल्या वस्तूऐवजी वेगळीच वस्तू पाठवल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी केली आहे.

या सेलबाबतच्या जाहिराती फसव्या असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्या आहेत. अनेक उत्पादनांची एमआरपी किंवा खरी किंमत दाखवण्याऐवजी फक्त ईएमआम किंमत दाखवण्यात येत असल्याने तीच खरी किंमत आहे, असे समजून अनेकजण ते प्रॉडक्ट विकत घेत आहेत. त्यानंतर त्याची खरी किंमत कळवल्यावर अनेक ऑर्डर कॅन्सल करण्यात येत आहेत.

एखाद्या प्रॉडक्टवर एमआरपीवर सूट देत असल्याचे भासवण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात ही सूट उत्पादक कंपनीनेच दिलेली असते. अनेकदा प्रॉडक्टच्या बॉक्सवर एमआरपी असते. त्यापेक्षा त्याची किंमत कंपनीनेच कमी केलेली असते. त्यामुळे आपल्याला मोठी सूट मिळत असल्याचे ग्राहकांना वाटते.त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे.

अशा प्रकाराला कंटाळून अनेक ग्राहकांनी आपल्या ऑर्डर रद्द केल्या आहेत. तर आपण मागवलेल्या वस्तूएवजी दुसरीच वस्तू आपल्याला पाठवल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. या सेलमुळए अनेक ग्राहक संतापले आहेत. हा ऑनलाईन सेल नसून ही फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.