महाराष्ट्रासह 3 राज्यात पुरामुळे भीषण परिस्थिती, अर्थमंत्री कर्नाटकात पोहोचल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

महाराष्ट्राप्रमाणेच केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये तुफानी पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या तीन राज्यात मिळून 72 तासात 93 जणांचे बळी गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरला तसेच कोकणाला मुसळधार पावसाचा आणि पुराचा जबर फटका बसला आहे. सांगली,कोल्हापूरमधली परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे.

केरळच्या वायनाडमध्ये भूस्स्खलनामुळे 42 जण ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. पावसामुळे या लोकांना वाचवण्यामध्ये अडथळे येत आहे. बचावकार्याला जेवढा उशिर होईल तितका या अडकलेल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे. केरळमध्ये गेल्या 72 तासात 42 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये पावसाचा वेग प्रचंड आहे. 20-40 सेंटीमीटर या वेगाने पाऊस केरळला झोडपून काढतोय. या पावसामुळे कोच्चि विमानतळ रविवारपर्यंत बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि केरळप्रमाणेच कर्नाटकातही परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण स्वत: कर्नाटकात पोहोचल्या आहेत.