
इंडोनेशियातील लीग फुटबॉल लढतीत चेंगराचेंगरी होऊन आठवडाही झाला नाही तोच आणखी एका सामन्यात फुटबॉल चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी फुटबॉलवेडय़ा अर्जेंटिनामध्ये दोन संघांचे चाहते एकमेकांना भिडले. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
अर्जेंटिना फुटबॉल स्टेडियमवर गुरुवारी रात्री जिम्नॅशिया आणि बोका ज्युनियर्स यांच्यातील अर्जेंटिना लीग सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या आणि रबराच्या गोळय़ा झाडल्या. यामध्ये एका चाहत्याचा मृत्यूही झाला.
इंडोनेशियातील फुटबॉल लढतीप्रसंगी चेंगराचेंगरीत 174जणांचा झाला होता मृत्यू
पाच दिवसांपूर्वीच इंडोनेशियातील पंजुरुहान स्टेडियमवर फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या चाहत्यांतील जोरदार राडय़ानंतर 174 जणांचा मृत्यू झाला होता, तर 180 जण जखमी झाले होते. बीआरआय लीग-1 मध्ये दोन संघांमध्ये सामना सुरू होता. यात एक संघ हरल्यानंतर त्यांचे चाहते मैदानात उतरले. या घटनेनंतरच पोलिसांनी कारवाई केल्याने एकच गोंधळ उडाला आणि झालेल्या चेंगराचेंगरीत 174 चाहत्यांचा मृत्यू झाला होता.





























































