फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती स्थिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महान फुलबॉलपटू पेले यांची आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱया डॉक्टरांनी दिली आहे. पेले यांच्यावर सावो पावलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोठय़ा आतडय़ातील कर्करोगाने ग्रस्त असलेल्या पेले यांच्यावर सप्टेंबरमध्ये शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली होती. उपचारानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मंगळवारी पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.