अजबच ! फक्त दोन पंजांनी सावरला पूल

44

सामना ऑनलाईन । व्हिएतनाम

सेंट्रल व्हिएतनाममधील के डा नांग येथील बा ना हिल्सवर ४ हजार ६०० फूटांच्या उंचीवर असलेला गोल्डन ब्रिज फक्त दोन मोठ्या पंजांनी सावरला आहे. जगातील ही अनोखी आणि दुर्मिळ अशी पूलाची स्थापत्यरचना आहे. जून महिन्यात हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. हा पूल तब्बल दीडशे मीटर लांबीचा आहे. तसेच समुद्रसपाटीपासून १४०० मीटरच्या (४ हजार ६०० फूट ) उंचीवर आहे. या पूलाची सुरुवातीची डिझाइन टीए लँडस्केप आर्किटेक्चरने तयार केली होती.

पूलावरून पर्वताच्या सौंदर्याचे दर्शन होत असल्याने मन प्रसन्न होते. हा पूल बनवण्यासाठी एक वर्ष लागले आहे. या पूलामुळे या हिल्स पर्यटकांचे आवडते स्थान बनल्या आहेत. या भागात फ्रेंच पद्धतीची घरे आणि बगीचे आहेत. तसेच ५.८ किलोमीटर लांबीचा केबल कार ट्रॅक आहे. एकेकाळी हा जगातील सर्वात उंचावरील ट्रॅक होता.

आपली प्रतिक्रिया द्या