पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलचा 90 हजारांचा बोकड चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमल याचा 90 हजार रुपये किमतीचा एक बोकड चोरीला गेला आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये अकमलच्या घराजवळ ही विचित्र घटना घडली आहे. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीसाठी कामरान अकमलच्या वडिलांनी 6 बकरे खरेदी केले होते. यापैकी 90 हजार रुपये किमतीचा एक बोकड चोरट्यांनी चोरला आहे. यामुळे बकरी ईदपूर्वीच चोरट्यांनी कामरान अकमलला धक्का दिला आहे. सोशल मीडियावर ही बातमी पसरल्यानंतर या घटनेवर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

जिओ न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कामरान अकमलच्या वडिलांनी बकरीदला कुर्बानी देण्यासाठी बाजारातून 6 बोकड खरेदी केले होते. हे बोकड त्यांनी घराबाहेर बांधले होते. पहाटे तीनच्या सुमारास वॉचमन झोपला असताना चोरट्यांनी अकमलचा बोकड चोरून नेला. त्या 6 बोकडांपैकी चोरी गेलेला बोकड सर्वात महागडा होता.

अकमलचा बोकड चोरीला गेल्याची माहिती त्याच्या गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. या बोकड चोरांना लवकरात लवकर पकडले जाईल आणि त्यांची चोरी झालेली बकरी परत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी कामरान अकमलच्या कुटुंबीयांना दिले आहे.