
पुणे शहरातील विविध भागात मेफेड्रॉन (एम.डी.) विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन कारवाईत चार तस्करांना अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केले. दोन वेगवेगळ्या कारवाईत 2 लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.
अमली पदार्थ विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कोरेगाव पार्क परिसरात एमडी तस्कराची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ऋषीकेश अनिल पासलकर, वय 25 रा. अपर डेपो, बिबवेवाडी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 लाख 5 हजारांचे 7 ग्रॅम एमडी, मोबाइल असा 1 लाख 10 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याशिवाय त्याने मेफेड्रोनची विक्री प्रणव प्रकाश ठाकुर, रा. रविवार पेठ याला केल्याचे उघडकीस आले.
रविवार पेठ परिसरातून पथकाने विशाल नंदकुमार शिंदे (वय 41 रा. शुक्रवार पेठ) याला अटक करून 1 लाख 15 हजारांचे 7 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले. त्याच्याकडून दुचाकी, मोबाइल असा मिळून 2 लाख 15 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. एमडी खरेदी करणारा जुनेद अफजल खान (रा. रविवार पेठ ) याच्यासह दोन कारवाईत पथकाने चौघांना अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, एपीआय शैलजा जानकर, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली.




























































