चार सामान्य व्यक्ती आज अंतराळात झेपावणार! कॅन्सरवर मात केलेल्या महिलेचा समावेश

एलन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज झाली आहे. स्पेसएक्स कंपनी 15 सप्टेंबर रोजी चार सामान्य व्यक्तींना अंतराळात पाठवणार आहे. यामध्ये कुणीही अंतराळवीर नाहीत. या मोहिमेला ‘इन्स्पिरेशन 4’ असे नाव देण्यात आले आहे.

फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस रिचर्स सेंटरवरून उद्या स्पेसक्राफ्ट उड्डाण घेईल. त्यामधून चार जणांना पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात येईल. जेयर्ड इसाकमॅन, हेयली आर्पेनो, शॉन प्रोक्टर, क्रिस सेम्ब्रोस्की अशी चौघांची नावे आहेत. त्यापैकी जेयर्ड इसाकमॅन यांनी मोहिमेला निधी दिला आहे. मोहिमेत एकमेव महिला असून त्यांचे नाव हेयली आर्पेनो आहे. हेयली यांनी कॅन्सरवर मात केली आहे. या अंतराळ मोहिमेतून हॉस्पिटलसाठी निधी संकलन केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या