
जमा केलेल्या रकमेवर प्रत्येक महिन्याला पेन्शन सुरू होते असे अमिष दाखवत 70 वर्षांच्या महिलेची 4 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी लातूरच्या गातेगावमध्ये चारजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर तालुक्यातील गातेगाव पोलीस ठाण्यात भागीरथी सखाराम कदम (वय 70, रा. वांजरखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, व्यंकट नारायण कदम आणि इतर तिघांनी संगनमत करून त्यांना तुम्ही जमा केलेल्या रकमेवर प्रत्येक महिन्याला पेन्शन सुरू होते असे अमिष दाखवत बीएनजी ग्लोबल इंडिया लिमीटेड या कंपनीत 4 लाख 65 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. रकमेबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता तुझे पैसे मिळणार नाहीत म्हणून त्यांनी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चौघांविरुध्द पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.




























































