
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ट्रव्हल्स बुकिंग करून देण्याच्या बहाण्याने अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱया एका टोळीतल्या दोघा भामटय़ांना माटुंगा पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. या भामटय़ांनी केलेले 25 हून अधिक सायबर गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. त्यांचा एक साथीदार पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सौमिल मोदी यांना परिवारासह फिरायला जायचे होते. त्यासाठी ते विविध ठिकाणांची माहिती घेण्यासाठी गुगलवर शोध घेत असताना त्यांना एक संकेतस्थळ मिळाले. त्या संकेतस्थळावर अधिक शोध घेतल्यावर त्यांना एक ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक मिळाला. मोदी यांनी त्या ई-मेल व पह्न नंबरवर संपर्क साधला असता समोरच्याने त्याची ओळख अर्जुन नायर अशी करून दिली. मोदी आणि नायर यांचे बोलणे झाल्यानंतर त्यांनी नायर याच्या पंपनीच्या ट्रव्हल्सने मालदीवला जायची तयारी दाखवली. त्यानंतर नायरने विमानाच्या बुकिंगसाठी मोदी यांच्याकडून 72 हजार रुपये घेतले. मग हॉटेल बुकिंग आदी वेगवेगळय़ा बाबींसाठी पैशांची मागणी करून मोदी यांना दोन लाख 38 हजार पाठविण्यास भाग पाडले. मात्र पैसे मिळाल्यानंतर नायरने मोदी यांना टाळण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच मोदी यांनी माटुंगा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दिगंबर पगार तसेच संतोष पवार, मंगेश जऱहाड, निकम, नीलेश साळुंखे या पथकाने गुह्याचा तपास सुरू केला.




























































