
मेष (ARIES – Wednesday, April 19, 2022)
नको तिकडे पैसे खर्च करताना विचार करा. दूर राहणाऱ्या नातेवाईकाकडून अनपेक्षितपणे गोड बातमी कानी येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदाचे असेल. आपल्या कुलदेवतेचे दर्शन घ्या.
शुभरंग : पिवळा
वृषभ (TAURUS – Wednesday, April 19, 2022)
कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेळ द्याल. स्वत:करिता वेळ काढायला विसरू नका. तणाव निघून जाण्यासाठी ध्यानधारणा करा. आवडत्या कला जोपासण्यासाठी वेळ काढा. मुलाखत देण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
शुभरंग : आकाशी
मिथुन (GEMINI – Wednesday, April 19, 2022)
तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. लहान मुलांसोबत खेळण्यासाठी वेळ द्या. जोडीदारासोबत तुमचे नाते आज नव्याने फुलेल. सायंकाळ मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्यात घालवाल.
शुभरंग : गुलाबी
कर्क (CANCER – Wednesday, April 19, 2022)
कोणालाही सल्ला द्यायला जाऊ नका. कोणत्याही गोष्टीचा अति विचार करत बसून वेळ वाया घालवू नका. प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवाल. आरोग्याकडे लक्ष द्या. घराचे सुशोभिकरण कराल. फुलांचा गुच्छ प्रिय व्यक्तिला भेट द्या.
शुभरंग : निळा
सिंह (LEO – Wednesday, April 19, 2022)
कोणाकडेही गंभीर चेहऱ्याने पाहू नका. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळाला भेट द्याल. एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा योग येईल. आवडता सिनेमा, नाटक पाहण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : केशरी
कन्या (VIRGO – Wednesday, April 19, 2022)
प्रिय व्यक्तिसोबत असलेले संबंध सुधारतील. संवाद सुधारेल. प्रवासाचा आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी एखादी न बोलणारी व्यक्ति तुमच्याशी आज अचानक बोलू लागेल. जुन्या मित्राची भेट होईल.
शुभरंग : पोपटी
तूळ (TULA- Wednesday, April 19, 2022)
काम करण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या. अथर्वशीर्षाचे वाचन करा. गोड बातमी कानी येईल. सौंदर्याची काळजी घ्या. व्यवसायात नव्या योजना राबवाल. पिंपळाच्या झाडाची पूजा करा. तिजोरीत मोगऱ्याच्या फुले ठेवा. फुलदाणीत सुगंधी फुले ठेवा.
शुभरंग : राखाडी
वृश्चिक ( SCORPIO -Wednesday, April 19, 2022)
सामाजिक कार्याचा आनंद घ्याल. निवांत राहाल. म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. शिवमंदिरात जाऊन अभिषेक करा. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या.
शुभरंग : पांढरा
धनु (SAGITTARIUS – Wednesday, April 19, 2022)
स्वत:ची प्रगती करणारे प्रकल्प हाती घ्याल. आत्मविश्वास वाढवणारे प्रसंग घडतील. तुमच्या विनोदबुद्धीचा इतरांवर प्रभाव पडेल. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कामात यश येण्याकरिता अनुभवी व्यक्तिंचे मार्गदर्शन घ्या.
शुभरंग : मोरपिसी
मकर ( CAPRICORN – Wednesday, April 19, 2022)
आवडीचा पदार्थ खायला मिळेल. अति खाणे टाळा. मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. आज मनाजोग्या घटना घडतील. आपल्यातील कलागुणांचा योग्य ठिकाणी वापर करा. सहलीला जाण्याचा बेत आखाल.
शुभरंग : काळा
कुंभ (AQUARIUS – Wednesday, April 19, 2022)
वरिष्ठ सहकाऱ्यांना घरी बोलवा. सकारात्मक विचार करा. भविष्यातील दीर्घकालिन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करा. आजाच दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : हिरवा
मीन (PISCES – Wednesday, April 19, 2022)
घरातील राहून गेलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. नवीन योजना, संकल्प राबवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. प्रिय व्यक्तिची भेट घ्याल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:साठी वेळ काढा. न येणाऱ्या गोष्टी शिकून घ्या.
शुभरंग : सोनेरी





























































