Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘22 एप्रिल’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Saturday, April 22, 2023)
पारिजातकाच्या झाड घराच्या अंगणात लावा. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. आवडती व्यक्ति तुमच्यासाठी आज वेळ काढेल. कोणालाही अनावश्यक आश्वासने देऊ नका. आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही असेल. नव्या संकल्पनांवर विचार करायला वेळ मिळेल.
शुभरंग : केशरी

वृषभ (TAURUS – Saturday, April 22, 2023)
सौंदर्याची काळजी घ्या. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. प्रवासाचे योग आहेत. सकाळचा थोडा वेळ सूर्यनमस्कार करण्यासाठी द्याल. नव्या पुस्तकाची खरेदी कराल. एखादा नवा विषय शिकण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : हिरवा

मिथुन (GEMINI – Saturday, April 22, 2023)
आत्मचिंतन करण्यासाठी वेळ मिळेल. मन मारून जगू नका. वेळीच औषधोपचार करणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. सकाळी तुळशीला पाणी घाला. अथर्वशीर्षाचे वाचन करा. जुन्या मित्रांची भेट होईल.
शुभरंग : किरमिजी

कर्क (CANCER – Saturday, April 22, 2023)
रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. आवडत्या व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल. मनाजोगती खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. दरोरोज व्यायाम करा. कोणाकडून अपेक्षा न ठेवण्याची स्वत:ला सवय लावून घ्या.
शुभरंग : नारिंगी

सिंह (LEO – Saturday, April 22, 2023)
प्राण्यांची काळजी घ्या. घराबाहेर जाताना थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या. आरोग्य चांगले राहिल. पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. अनावश्यक प्रवास टाळा. मिळालेली संधी सोडू नका. आपला अट्टाहास नियंत्रणात ठेवा. विष्णुसहस्त्रनामावलीचे वाचन करा.
शुभरंग: राखाडी

कन्या (VIRGO – Saturday, April 22, 2023)
अडथळ्यांची शर्यत पार कराल. कोणत्याही गोष्टिंचा अतिरेक करू नका. आरोग्याबाबत जागरुक राहा. कामे यशस्वीपणे पूर्ण कराल. बुद्धीला खतपाणी मिळेल. प्रिय व्यक्तिच्या कामाचे कौतुक करा.
शुभरंग : तांबडा

तूळ (TULA- Saturday, April 22, 2023)
इतरांना सल्ले देत बसू नका. स्वत:चे विचार अंमलात आणा. शाकाहाराला प्राधान्य द्या. दगदग कमी करण्याचा प्रयत्न करा. आराम करण्यासाठी वेळ काढा. मनाची एकाग्रता साधाल. घरगुती वातावरण बिघडणार नहाी, याची काळजी घ्या.
शुभरंग : खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Saturday, April 22, 2023)
वेळेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्या. संयमाने यश मिळवाल. एकमेकांबद्दल विश्वासार्हता वाढवाल. मित्रमंडळींचा गैरसमज होईल, असे विचार करू नका. मनावर कोणतेही दडपण घेऊ नका.
शुभरंग : सोनेरी

धनु (SAGITTARIUS – Saturday, April 22, 2023)
झेपतील त्याच जबाबदाऱ्या घ्या. नकारात्मक विचार करू नका. स्वत:च स्वत:चे कौतुक करू नका. समस्या सौम्य शब्दात मांडायला शिका. महत्त्वाच्या कामांची यादी करून ती कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंग : किरमिजी

मकर ( CAPRICORN – Saturday, April 22, 2023)
वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. समजूतदारपणा दाखवावा लागेल. मनासारखे यश मिळण्याचा काळ आहे. दीर्घकाळ गुंतवणूक करताना योग्य मार्गदर्शन घ्या. समाजात कौतुक होईल. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : काळा

कुंभ (AQUARIUS – Saturday, April 22, 2023)
सर्वांशी गोडीगुलाबीने वागा. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. नियोजित कामाचे सुयोग्य नियोजन करून कामाची विभागणी कराल. कुटुंबाची कर्तव्ये पार पाडाल. मन शांत ठेवा.
शुभरंग : आकाशी

मीन (PISCES – Saturday, April 22, 2023)
थोडेसे मधुरभाषी व्हा. समजंसपणे वागणे हितावह आहे. उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा. प्रेम प्रसंगात सावधगिरी बाळगा. दूरच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल.
शुभरंग : मोरपिसी