
बाल कर्करोगाविरुद्धच्या लढाईत यावेळी मैदान गाजवलं ते सायकलस्वारांनी. कॅनकिड्स किड्सकॅनच्या ‘सायकल फॉर गोल्ड’ या देशातील सर्वात मोठया चॅरिटी सायकलिंग चॅलेंजमधून तब्बल 3.1 कोटींचा निधी उभारण्यात आला. 365 हून अधिक शहरांतील 2,236 सायकलपटूंनी तब्बल 12 लाख किलोमीटर सायकलिंग करत बाल कर्करोगग्रस्त मुलांसाठी आशेचा नवा मार्ग खुला केला.































































