अकरावीचे 91.7 टक्के प्रवेश पूर्ण, सहाव्या विशेष फेरीनंतर 367 विद्यार्थी प्रवेशाविना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावीचे जवळपास 92 टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून लवकरच शिक्षण संचालनालयाकडून अंतिम प्रवेशफेरीची घोषणा होण्याची शक्यता आहे. नुकतीच सहावी विशेष फेरी पार पडली. या फेरीत कॉलेज अलॉट झालेल्या 2120 विद्यार्थ्यांपैकी 1756 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून एका विद्यार्थ्याने प्रवेश नाकारला, तर दोघाजणांनी प्रवेश रद्द केले आहेत.

मुंबई विभागातून अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या 2 लाख 89 हजार 718 विद्यार्थ्यांपैकी 91.7 टक्के म्हणजेच 2 लाख 65 हजार 659 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मुंबई विभागात अकरावीच्या एकूण 3 लाख 88 हजार 718 जागा उपलब्ध होत्या. त्यांपैकी तब्बल 1 लाख 22 हजार 816 जागा रिक्त राहिल्या आहेत. येत्या दोन दिवसांत सर्व अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा आढावा घेऊन अंतिम फेरीची घोषणा केली जाणार आहे.
आतापर्यंत झालेल्या प्रवेशाची स्थिती