महात्मा गांधी देखील म्हणायचे ‘हे राम!’, जी.किशन रेड्डी यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

भाजपचे जी.किशन रेड्डी यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. रेड्डी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पश्चिम बंगालमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने त्यांच्याविरूद्ध झालेल्या कारवाईबाबत विचारण्यात आले.या प्रश्नाला उत्तर देताना रेड्डी म्हणाले की जय श्रीराम म्हटल्यामुळे त्या घोषणा देणाऱ्यांविरोधात कारवाई करणं चुकीचं आहे. जय श्रीराम हिंदुस्थानात म्हणायचे नाही तर मग पाकिस्तानात म्हणायचे का असा सवालही रेड्डी यांनी विचारला आहे.

आज तक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेड्डी यांनी जय श्रीराम म्हटल्याने करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना महात्मा गांधी देखील ‘जय श्रीराम’ म्हणायचे असं म्हटलं आहे. रेड्डी यांनी या मुलाखतीमध्ये हैदराबाद हे दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनत चालल्याचे म्हटले आहे. NIA ने छापे मारले की त्याचे धागेदोरे हैदराबादशी जुळताना दिसतात असेही रेड्डी म्हणाले.