
परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट, मालाड मुंबई यांच्या वतीने 25 ते 31 ऑक्टोबरदरम्यान कार्यक्रमांचे आयेजन करण्यात आले आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे साजरा होत असलेल्या या दर्शन सोहळा कार्यक्रमात कोरोनामुळे भाविकांना प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार भाविकांना आश्रमात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. कोरोनापासून सर्वांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून सरकारतर्फे घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे भाविकांनी आपल्या घरातूनच महाराजांचे भजन, नामस्मरण करावे, असे आवाहन आश्रमाचे विश्वस्त निषाद पाटणकर यांनी केले आहे.































































