गजानन महाराज प्रगटदिनोत्सव अंतर्गत कार्यक्रमाने साधेपणाने साजरा होणार

कोरोना संसर्गामुळे यावर्षीचा श्रींचा प्रगटदिनोत्सव अंतर्गत कार्यक्रमाने साजरा होणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे संस्थानने दिली आहे. श्रींचा प्रगटदिन उत्सव सालाबादाप्रमाणे दरवर्षी श्री संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमासह लाखो भाविक भक्तांच्या व वारकर्‍यांचे उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

मागील वर्षापासून आतापर्यंत कोरोना महामारीचे संकट पसरले असल्याने तसेच कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या निर्देशानुसार प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने शुक्रवारी असलेला श्रींचा 143 वा श्री प्रगटदिनोत्सव सालाबादाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार नाही. उत्सवातील कार्यक्रम धार्मिक प्रथा, परंपरेनुसार मोजक्या उपस्थितीत अंतर्गतच संपन्न होतील. सर्व भाविक भक्त व वारकरी मंडळींनी याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री संस्थानकडून करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या