काळबादेवीत झाड कोसळल्याने गणपतीपुळ्यापर्यंत ट्रॅफीक जाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी ते गणपतीपुळे मार्गावर काळबादेवी येथे झाड पडल्यामुळे दुतर्फा वाहतूक दीड-दोन तास ठप्प होती. यामुळे दिवाळीच्या सुटीत गणपतीपुळ्यात आलेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला.

रत्नागिरीतून आरे-वारे मार्गे गणपतीपुळेला जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक गणपतीपुळ्यात दाखल झाले. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास काळबादेवी येथील रस्त्यावर झाड पडले. झाड रस्त्यावर पडल्यामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली. तासाभरात वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक ठप्प झाल्याने पर्यटकांचा खोळंबा झाला. अखेर मदतीकरिता स्थानिक मंडळी आली. स्थानिक मंडळीनी झाड तोडल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.