
विरोधी पक्षात असल्याने विकासकामांना निधी मिळत नाही, अशी ओरड करत शिवसेनेची साथ सोडून पळालेले सहा खासदार मिंध्यांच्या कळपात सामील झाले. या पळपुटय़ा सहा खासदारांना मागील दोन वर्षांत जवळपास 100 कोटींचा निधी मिळाला. त्यातील अवघे 13 कोटी रुपयेच त्यांनी खर्च केले. संसदेच्या आकडेवारीतूनच गँग ऑफ गद्दारांचा खोटारडेपणा उघड झाला असून फुटिरांच्या कर्तृत्वाची पोलखोल झाली आहे.
निधी न मिळणं आणि विकासकामे करायला अडचणी येत असल्याचा दावा शिंदे गटात सामील झालेल्या सहा फुटीर खासदारांनी केला होता. संजय जाधव, नागेश पाटील-आष्टीकर, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, ओम निंबाळकर यांच्या मतदारसंघातील कामांसाठी मंजूर झालेल्या निधीपैकी 60 ते 70 टक्क्यांपेक्षा जास्त निधी तसाच पडून आहे. खासदार ओम निंबाळकर यांना 18.5 कोटी निधी मिळाला होता. त्यापैकी फक्त 2 कोटीच खर्च केले आहेत. संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघातील 40 विकासकामांपैकी एकही काम पूर्ण झालेले नाही. त्यांना मिळालेल्या 14 कोटी 70 लाखांपैकी 14 कोटी 54 लाख रुपयांचा निधी पडून असल्याचे धक्कादायक वास्तव संसदेच्या आकडेवारीतूनच समोर आले आहे.
भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
मंजूर निधी -14.07 कोटी
खर्च केलेला निधी -71 लाख
135 विकासकामांपैकी 2 कामे पूर्ण
संजय जाधव (परभणी)
मंजूर निधी -14.07 कोटी
खर्च केलेला निधी -3.38 कोटी
56 विकासकामांपैकी 25 कामे पूर्णत्वाकडे
नागेश पाटील-आष्टीकर (हिंगोली)
मंजूर निधी -19 कोटी
खर्च केलेला निधी -5.06 कोटी
79 विकासकामांपैकी फक्त 28 कामे पूर्ण
ओम निंबाळकर (धाराशीव)
मंजूर निधी -18.05 कोटी
खर्च केलेला निधी -1.97 कोटी
130 विकासकामांपैकी फक्त 21 कामे पूर्ण
संजय देशमुख (वाशिम)
मंजूर निधी -18.06 कोटी
खर्च केलेला निधी -1.42 कोटी
106 कामांपैकी फक्त 7 कामे पूर्ण
संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)
एकूण मंजूर झालेला निधी -14.07 कोटी
खर्च केलेला निधी -15 लाख
40 विकासकामांपैकी एकही काम पूर्ण
नाही































































