
सामना ऑनलाईन । रांची
झारखंडमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधमाने बालिकेचे अपहरण करून तिच्यावर साथीदारासह सामुहिक बलात्कार केला आहे. बलात्कार केल्यानंतर तिचा खून करून मृतदेह फेकून दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिंकी साहू आणि कैलाश कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
Jharkhand: Minor girl allegedly raped & beheaded in Jamshedpur on 25th July. Mustafa Ansari, DSP Rail says, “2 people have been arrested. Accused is a psycho killer, he has been jailed earlier in similar cases. Head of victim not recovered yet.” pic.twitter.com/Lhav2h0jLa
— ANI (@ANI) August 1, 2019
25 जुलै रोजी झारखंडच्या टाटानगर रेल्वे स्थानकावर पीडित मुलगी आपल्या आईच्या कुशीत झोपली होती. तेव्हा रिंकू साहू याने मुलीचे अपहरण केले. बालिकेचे अपहरण करून रिंकूने एका निर्जन ठिकाणी नेले आणि आपला साथीदार कैलाश कुमार याच्यासह मुलीवर बलात्कार केला. नंतर मुलगी सारखी रडत होती. तेव्हा रागाच्या भरात रिंकूने तिचा गळा चिरून तिचा मृतदेह टाटानगरच्या धोबी घाटाजवळ टाकून दिला.
पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज पाहून नराधमांना अटक केली. नंतर पोलिसांना मुलीचा मृतदेह धोबी घाटाजवळ आढळला. तेव्हा तिचे मुंडकेच नव्हते. मुलीच्या आईला मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितले तेव्हा, मुलीचा मृतदेह पाहून आई सारखी बेशुद्ध पडत होती. मुलीचे वडील सीआरपीएफचे जवान आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग पुलवामामध्ये आहे.

























































