Video – रिल्ससाठी मंत्रालय बनले गुंडांचे आवडते ठिकाण

mantralay

गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपला दरारा आहे हे दाखवण्यासाठी ‘भाई’ रिल्स बनवू लागली आहेत. पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे तर चक्क मंत्रालयातील रिल्स तयार करण्यात आले आहेत. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर जमिनीवर उकिडवा बसलेलल्या अवस्थेत घायवळचे फोटो काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते.

हाच घायवळ ताठ मानेने आणि छाती फुगवून मंत्रालयात आपल्या साथीदारांसह फिरताना दिसतो आहे. या सगळ्या प्रकारावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली असून त्यांनी गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे अशी उपरोधिक टीका केली आहे.