राज्यातील डान्सर गौतमी पाटील हिच्यावर दाखल असलेल्या एका गुन्हाप्रकरणी ती सोमवारी नगरच्या न्यायालयामध्ये वेशभूषा बदलून हजर झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर गौतमी पाटील हिला अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. गौतमी पाटील नगरच्या जिल्हा न्यायालयात सोमवारी हजर झाली. गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजकांनी विनापरवानगी कार्यक्रम घेत नियमांचं उल्लंघन केलं होतं. याप्रकरणी गौतमी पाटीलवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने अटी आणि शर्तींनुसार जामीन मंजूर केला आहे.
गौतमीच्या काही कार्यक्रमाला काही तरुणांकडून हुल्लडबाजी होण्याच्या घटना याआधी अनेकदा घडल्या आहेत. गेल्या वर्षी गणपती उत्सवाच्या काळात एका ठिकाणी नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळेला पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली होती. तरीही आयोजकांनी कार्यक्रम घेतला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये आयोजकांसह गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गौतमीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अन्यथा तिच्याविरोधात कोर्टाकडून वॉरंट निघण्याची शक्यता होती. त्यामुळे गौतमी सोमवारी न्यायालयात हजर झाली. न्यायमूर्तींनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला.