विश्वचषकातील अपयशानंतरही विराट कर्णधारपदी कायम कसा? : गावस्कर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

विश्वचषकामध्ये हिंदुस्थानला उपांत्यफेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विराट कोहली कर्णधारपदावर कायम कसा, असा सवाल माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला आहे. विश्वचषकानंतर कोहलीकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्यापूर्वी एक बैठक घेऊन यावर चर्चा करण्याची आवश्यकता होती, असेही ते ‘मिड-डे’मधील आपल्या लेखात म्हणाले.

‘आमच्या माहिती प्रमाणे विराट कोहलीची नियुक्ती फक्त विश्वचषकापर्यंतच होती. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी विराट कोहलीला कर्णधारपदावर कायम ठेवण्यापूर्वी एक बैठक होणे आवश्यक होती. ही बैठक पाच मिनिटंच चालते परंतु ती होणे आवश्यक होते. बैठक न घेता विराटला कर्णधारपदावर कायम ठेवण्यात आले असेल तर यावर सवाल उठवणे आवश्यक आहे. विराट कशाच्या बळावर कर्णधारपदावर कायम आहे? तसेच निवड समिती मेहबान असल्याने तो कर्णधार आहे का?’, असा सवाल गावस्कर यांनी उपस्थित केला.

गावस्कर पुढे लिहितात, निवड समिती फक्त कठपुतळी आहे. त्यामुळे विराटला मनाप्रमाणे संघ निवड करण्याचा हक्क मिळतो. परंतु विराटने विश्वास दाखवलेले केदार जाधव, दिनेश कार्तिक हे खेळाडू विश्वचषकामध्ये फेल झाले आणि त्यामुळेच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.