घनसावंगी तालुक्यात गारपिटीमुळे ज्वारीचे नुकसान

247

शुक्रवारी रात्री जालना जिल्ह्यतील घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे वादळी वारा व गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे शुक्रवारी वादळी वारा व गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शकुंतला मल्हारराव वरखडे यांची 4 एकर, अमर अशोकराव वरखडे यांची 3 एकर तसेच प्रल्हाद वरखडे, परशुराम वरखडे, दत्ता उधारे, सतिश वरखडे, कृष्णा प्रल्हाद वरखडे, रवि वरखडे, कैलास भाऊराव वरखडे, सुरेश वरखडे, सय्यद मुनव्वर अली, सुरेश भगवानराव वरखडे, सिध्देश्वर बळीराम वरखडे, रेवनाथ परशुराम वरखडे यांच्या ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन शेतक-यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या