Ghatkopar murder वाईट नजर आणि पैशांमुळेच झाली हिरे व्यापाऱ्याची हत्या

128

सामना ऑनलाईन । घाटकोपर

घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदाणी यांच्या हत्या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी विक्रोळी महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे 1300 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. उदाणी यांची हत्या वाईट नजर आणि पैशांमुळे झाल्याचे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांचा माजी स्वीय सहाय्यक सचिन पवार आणि निलंबित कॉन्स्टेबल दिनेश पवार याच्यासह दिनेश पवार, महेश भोईर, प्रविण, सिद्धेश पाटील, साहिस्ता खान आणि निशात खान यांना पोलिसांनी डिसेंबरमध्येच अटक केली आहे. या सर्वांवर उदाणी यांचे अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sachin-pawar

27 नोव्हेंबर, 2018 ला घाटकोपरचे हिरे व्यापारी राजेश्वर उदाणी हे गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर आठवडाभराने उदाणी यांचा मृतदेह पनवेलमध्ये सापडला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत सचिन पवार याच्यासह पाच जणांना अटक केली होती. न्यायालयाने पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा अवधी दिला होता. हा अवधी 8 मार्च रोजी संपणार होता. त्यापूर्वीच पोलिसांनी या हत्याकांडाचे आरोपपत्र महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे सादर केले. या आरोपपत्रामध्ये 214 साक्षिदारांचे जबाब, ऑटोप्सी रिपोर्ट, डीएनए रिपोर्ट आणि शवविच्छेदन अहवाल जोडण्यात आले आहेत. तसेच उदाणी आणि आरोपी सचिन पवार यांच्यामध्ये व्हॉट्सअॅपवर झालेल्या मेसेजचाही उल्लेख करण्यात आला आहे.

ghatkopar-murder

उदाणी यांनी सचिन पवारला पाठलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, ‘गेल्या वर्षभरापासून मी तुला भिकाऱ्यासारखे माझेचे पैसे मागत आहे. मला वाटले होते की तू चांगला आणि शब्दाला जागणारा व्यक्ती असेल, परंतु तू मला चुकीचे ठरवेल आहेत. आता देवच वाचवेल… कर्म ठरवेल काय ते.’ याला प्रत्युत्तर देताना सचिन म्हणतो की, ‘सर गेल्या तीन ते चार दिवसांपासून बरं नसल्याने कोठेही गेलेलो नाही, परंतु तीन डिसेंबरपर्यंत हा व्यवहार संपवून टाकू, माफ करा.’ यानंतर काही दिवसात हिरे व्यापारी उदाणी गायब होतात आणि त्यांची हत्या झाल्याचे समोर येते.

उदाणींचा सचिनच्या गर्लफ्रेंडवर डोळा
दरम्यान, आरोपपत्रामध्ये हत्येचे आणखी एक कारण देण्यात आले असून उदाणी यांचा सचिनची गर्लफ्रेंड टीव्ही अभिनेत्री देबोलिना भट्टाचर्जीवर डोळा होता असेही नमूद करण्यात आले आहे. पैशांचा व्यवहार आणि महिलेवर नजर यातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी आरोपत्रात म्हटले आहे. या प्रकरणी देबोलिना भट्टाचर्जी हिची चौकशीही करण्यात आली होती.

राजेश्वर उदानी हत्याप्रकरणी मी का घाबरू! देबोलिना भट्टाचर्जी
हिरे व्यापारी हत्याकांड मॉडेल तरुणीसह दोघांना अटक आरोपींची संख्या सहा
महिला व पैशांच्या वादातून हिरे व्यापाऱ्याची हत्या, दोघांना अटक
आपली प्रतिक्रिया द्या