दररोज जी-मेलवर 10 कोटी ‘फिशिंग’ हल्ले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनेटचा वापर म्हटलं की सायबर सुरक्षेचा विषय आलाच. इंटरनेट युजर्सला ‘फिशिंग’सारख्या (नवली वेबसाईट) सायबर हल्ल्याला तोंड द्यावे लागते. अशातच दररोज 10 कोटी युजर्सच्या जी-मेल अकाऊंटवर होणारे ‘फिशिंग’ हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा गुगल कंपनीने केला आहे. याशिवाय 100 अब्ज ऍप्सवरील मालवेयर स्कॅन करतो, असेही गुगलने म्हटले आहे.

गुगलची जी-मेल सेवा जगभरात वापरली जाते. जी-मेल युजर्सला ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असल्याची माहिती गुगलने दिली आहे. सायबर हल्ल्यांचा फटका पर्सनल युजर, प्रायव्हेट आणि सरकारी सेक्टर अशा सर्वांनाच बसलेला आहे. त्यामुळे गुगल कंपनीने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने स्वत:मधील उणिका शोधून त्यावर काम करायला सुरुवात केल्याचे ग्लोबल अफेअरचे वरिष्ठ अधिकारी केंट वाॅकर यांनी सांगितले.