गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
goa assembly

सामना प्रतिनिधी, पणजी

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून प्रारंभ होत आहे. 9 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. विधानसभेत प्रश्न विचारणाऱया विरोधी काँग्रेस पक्षाचे 10 आमदार भाजपात सामील झाल्यामुळे त्यांचे सर्व प्रश्न रद्दबातल झाले आहेत. त्याचा परिणाम अधिवेशनाच्या कामकाजावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेसकडे फक्त 5 आमदार असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद त्यांनी गमावल्यात जमा आहे. या 5 आमदारांचे प्रश्न चर्चेला येतील, असा अंदाज आहे. सक्षम विरोधीपक्ष व नेता नसल्यामुळे अधिवेशनातील कामकाज एकतर्फी होण्याची शक्यता आहे. गेली अडीच वर्षे मंत्री असलेल्या गोवा फॉरवर्डच्या तीन आणि अपक्ष एक मिळून चौघांवर आता विरोधी बाकावर बसण्याची पाळी आली आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष अशा एकूण 11 जणांना आता विरोधी पक्षाची भूमिका वठवावी लागणार आहे.