
गोव्यात मडबाथच्या बहाण्याने एका विदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना गोव्याच्या उत्तर भागात घडली आहे.
ही महिला आपल्या पतीसोबत गोव्यात पोहोचली होती. तेथील एका समुद्र किनाऱ्यावर ती आराम करत होती. तिथे त्यांना 32 वर्षांचा जोएल विंसेंट डिसूझा भेटला. त्याने महिलेला मडबाथ देण्याबाबत सांगितलं. महिलेने त्याची ऑफर स्वीकारली.
मग तिला तो उत्तरेच्या दिशेने असलेल्या हरमळ येथील किनाऱ्यावर घेऊन गेला. तिथे त्याने मडबाथ द्यायला सुरुवात केली. मडबाथ देताना जोएलने तिची छेड काढली आणि तिच्यावर बलात्कार केला.
ही घटना दोन जूनची असून महिलेने 6 जून रोजी याची तक्रार नोंदवली. महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पेडणे पोलिसांनी सोमवारी 6 जून रोजी जोएल डिसोझा याला अटक केली आहे. पेडणे येथील पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी सांगितले की, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तपास पोलिस उप अधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






























































