
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
‘म्हणतात ना उपरवाला देता है तो छप्पर फाड के’ याचेच उदाहरण परळी शहरात पहायला मिळाले. बरकतनगर येथील एका कुटुंबाकडे असणाऱ्या शेळीने चक्क पाच करडांना जन्म दिला असून त्यात दोन बोकड व तीन पाट आहेत. त्यांची तब्येतही ठणठणीत आहे.
परळी शहरातील बरकतनगर भागात राहणाऱ्या शेख चाँद पाशा यांच्या कडे असणाऱ्या शेळीने पाच पिलानां जन्म दिला असुन पाचही पिलांची तब्येत ठिक आहे. शेळीने पाच पिल्ले दिल्याची घटना परळीत प्रथमच घडली असल्याचे त्यांनी सांगितले. या पाच पिलांना पाहण्यासाठी शेख चाँद पाशा यांच्या घरी लोकांनी रिघ लावली आहे.




























































