गोदड महाराजांच्या रथयात्रेदरम्यान 18 चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत येथील श्रीसंत सद्गुरू गोदड महाराजांच्या रथयात्रेदरम्यान कर्जत पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नियोजनातून लावलेल्या ट्रपमधील सहा तासांमध्ये तब्बल 18 सराईत चोरटे कर्जत पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

आर्यन अमिताभ निमगावकर (रा. कर्जत), सागर ताराचंद भागडे, आनंद रवींद्र पवार उर्फ टकशा (दोघे रा. गोरोबा टाकी, जामखेड), काजल कलाकार चव्हाण उर्फ काजल अविनाश काळे (रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड), निर्मला हनुमंत जाधव, हनुमंत मुडय़ा जाधव (दोघेही रा. लेखानगर नाशिक), अमोल जालिंदर काळे (रा.अरणगाव), किरण रावसाहेब काळे (रा. मिलिंदनगर, जामखेड), संतोष शंकर चव्हाण (रा. उरुळीकांचन), राहुल रमेश जाधव (रा. यशवंतनगर, अकलूज), गोवर्धन सुरेश काळे (रा. सदाफुले वस्ती, जामखेड), कमल बबन फुलवरे, मंगल संभाजी शिंदे, शीला पप्पू फुलवरे (तिघेही रा. गेवराई, जि. बीड), रोहिणी सुनील पिटेकर, स्वाती संतोष पिटेकर, राणी शरद पिटेकर, (तिन्ही रा. म्हाळंगी, ता. कर्जत), माया प्रवीण गायकवाड, सोनी जगत राकडे, इंदू आनंदा गायकवाड (तिन्ही रा. अशोकनगर, ता. जि. वर्धा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गेली दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कर्जतची गोदड महाराजांची रथयात्रा भरली नव्हती. मात्र, यंदा नागरिकांच्या उच्चांकी गर्दीचा आकडा पार झाला. गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांना लुटण्यासाठी, दागिने, रोकड, चोऱया करण्यासाठी असंख्य सराईत चोरटे परजिह्यातून, परगावाहून या यात्रेत सहभागी झाले होते. मात्र, चोरटय़ांचे मनसुबे कर्जत पोलिसांनी मोडीत काढले. यंदा रथयात्रेतील गर्दीवर 29 सीसीटीव्ही कॅमेऱयांची नजर होती. त्यामुळे टवाळखोरांना आणि गुन्हेगारांना मोठा चाप बसला. चोऱया करण्यासाठी विविध जिह्यांतून व तालुक्यांतून आलेल्या या सराईत चोरटय़ांवर अगोदरही अनेक गुन्हे दाखल होते. कर्जत पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 18 जणांना ताब्यात घेण्यात आले.

सर्व आरोपींवर जबरी चोरी, चोरी, चोरीचा प्रयत्न, संशयास्पद परिस्थितीत फिरणे अशा प्रकारचे गुन्हे कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत. यातील पाच आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 12 अटक आरोपींवर नगर, पुणे, सोलापूर, वर्धा येथे चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक अनंतराव सालगुडे, पोलीस जवान श्याम जाधव, अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, सुनील खैरे, गोवर्धन कदम, शकील बेग, ईश्वर नरोटे, कोमल गोफणे, राणी व्यवहारे, बळीराम काकडे, जयश्री गायकवाड, भरत डगोरे, सलीम शेख, उद्धव दिंडे, प्रवीण अंधारे, शाहूराज तिकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.