मोठी बातमी: गोध्रा जळीतकांड प्रकरणात आणखी दोन जण दोषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
godhra-train-coach-burning

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातच्या २००२ मधील गोध्रा जळीतकांड प्रकरणी विशेष एसआयटी न्यायालयाने दोन जणांना दोषी ठरवलं आहे. तर अन्य तीन जणांची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्ताता केली आहे.

ग्रोधा जळीत कांडप्रकरणी न्यायालयाने आधी ३१ जणांना दोषी ठरवत निकाल दिला होता. मात्र हे आरोपी निकाल लागल्यानंतर एटीएसच्या हाती लागले होते. त्यामुळे त्यांच्यावर नंतर आरोपपत्र दाखल करून पुन्हा वेगळा खटला चालवण्यात आला. अखेर त्यावर निकाल देताना दोन जणांना दोषी ठरवण्यात आलं असून अन्य तिघांना संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे.

गोध्रा येथे २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला आग लावली होती. या डब्यातील बहुसंख्य प्रवासी हे कारसेवक होते. ५९ प्रवाशांचा या घटनेत मृत्यू झाला होता. याप्रकरणी विशेष न्यायालयाने १ मार्च २०११ रोजी निकाल दिला होता. यात ३१ जणांना दोषी ठरवण्यात आले तर ६३ जणांची सुटका करण्यात आली होती. दोषींपैकी ११ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर २० जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये गुजरात उच्चन्यायालयाने फाशीची शिक्षा झालेल्या ११ दोषींना दिलासा देत फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती.

summary: 2002 Godhra train burning case; Two accused found guilty, three acquitted by special SIT court in Ahmedabad