
हिंदुस्थानी बाजारात सोन्याचा दर पुन्हा एकदा कमी झाला आहे. सोन्याचा दर कमी झाला असला तरी चांदीची चमक मात्र कायम आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर कमी झाल्याने सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.
सोन्याच्या दरामध्ये सोमवारी 0.15 टक्के घसरण झाली आणि 10 ग्रॅम (एक तोळा) सोन्याचा दर 47 हजार 451 रुपयांवर स्थिरावला. चांदीचा दर मात्र 65 हजार 261 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. गेल्या वर्षी विक्रमी स्तर 56 हजार 200 रुपयांवर गेलेले सोने तुलनेत 8 हजार 700 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. मात्र आगामी काळ सणांचा असल्याने सोन्याच्या दरात वाढ दिसण्याची चिन्हे आहेत.
Good Returns नुसार सोन्याचा दर 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47 हजा 420 रुपये आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 46 हजार 420 रुपये आहे.
प्रमुख शहरातील 10 ग्रॅम सोन्याचे दर
दिल्ली – 22 कॅरेट सोने 46,670 आणि 24 कॅरेट सोने 50,920
मुंबई – 22 कॅरेट सोने 46,420 आणि 24 कॅरेट सोने 47,420
कोलकाता – 22 कॅरेट सोने 47,020 आणि 24 कॅरेट सोने 49,720
चेन्नई – 22 कॅरेट सोने 44,980 आणि 24 कॅरेट सोने 49,070




























































