
सोन्याची तस्करी करणाऱया एका खाजगी शिक्षकाला हवाई गुप्तचर विभागाने रंगेहाथ पकडले. सलाहुद्दीन अमीन, असे या शिक्षकाचे नाव असून त्याच्याकडून एक कोटी 21 लाख रुपये किंमतीचे दोन किलो 198 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी सलाहुद्दीन अमीन हा जेद्दाहहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. बीएसएम स्क्रिनिंगमध्ये त्याच्या बॅगेत सोने असल्याचे दिसून आले. त्यामुळे हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱयांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात दोन किलो 198 ग्रॅम वजनाचे 24 पॅरेट आणि 22 पॅरेटचे सोने सापडले. त्याची किंमत एक कोटी 21 लाख रुपये इतकी आहे. तपासात सलाहुद्दीन हा चिंचबंदर, मांडवी परिसरात राहत असून व्यवसायाने खासगी शिक्षक म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वीच तो जेद्दाहला गेला होता. तेथूनच त्याने ते सोने आणले होते.























































