युजर्सच्या डेटा चोरीप्रकरणी दहा ऍप्सवर गुगलकडून बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युजर्सच्या सुरक्षिततेचा विचार करता गुगलने नुकतीच दहा लोकप्रिय अॅप्सवर बंदी घातली असून प्ले स्टोअरवरून हटवली आहेत. युजर्सच्या डेटा चोरीप्रकरणी गुगलकडून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बॅन करण्यात आलेल्या या अॅप्सच्या मदतीने हॅकर्सला युजर्सचे लोकेशन सहज मिळते. तसेच ई-मेल, फोन नंबर आणि पासवर्डची चोरी होऊ शकते. या अॅप्सच्या मदतीने कट आणि पेस्टद्वारे डेटा चोरी होतो असे गुगलला आढळले आहे. बॅन करण्यात आलेल्या अॅप्समध्ये स्पीड राडर कॅमेरा, अल-मोझीन लाइट, वायफाय माऊस, क्यूआर अॅण्ड बारकोड स्कॅनर, किबला कम्पॉस, सिंपल वेदर अॅण्ड क्लॉक विजेट, हॅण्डसेंट नेक्स्ट एसएमएस, स्मार्ट कीट 360, फुल्ल कुराण एमपीथ्री लँग्वेज अॅण्ड ट्रान्सलेशन, ऑडीओजड्रॉईड ऑडिओ स्टुडिओ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जगभरात सहा कोटींहून अधिक युजर्सने ही अॅप्स डाऊनलोड केली आहेत.  अजूनही ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप्स आहेत त्यांनी ते त्वरित डिलीट करावे, असा सावधानतेचा इशारा गुगलने दिला आहे.