
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू आणि कश्मीरच्या पहिल्या आयएएस टॉपरने बलात्काराच्या वाढत्या घटनांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. २०१०च्या यूपीएससी परीक्षेत अव्वल आलेला फैसल शाह यामुळे चांगलाच अडचणीत आला आहे.
देशात वाढत असलेल्या बलात्कारांवर फैसलने “पितृसत्ता + लोकसंख्या + निरक्षरता + दारू + पॅार्न + तंत्रज्ञान + अराजक = रेपिस्तान” असं ट्वीट केलं होतं. या ट्वीटवर आक्षेप घेत सरकारने त्याला नोटीस पाठवली आहे. त्यानुसार, सरकारने हे ट्वीट एका शासकीय अधिकाऱ्यासाठी अशोभनीय आहे. एका शासकीय अधिकाऱ्याने आपलं कर्तव्य निभावताना संपूर्ण इमानदारी आणि सत्यनिष्ठेचं पालन करणं आवश्यक आहे. या नियमाचा भंग केल्याने फैसलवर अनुशासनात्मक कारवाई केली जाणार आहे.
आपण हे ट्वीट दक्षिण आशियाई देशांमध्ये होत असलेल्या बलात्कारांच्या वाढत्या प्रकारांवर केलं होतं. तसंच हे ट्वीट खूप आधी केलं होतं, असा दावाही फैसल याने केला आहे.



























































