Video – दिव्यांग व्यक्तीला काठीने झोडपले, उत्तर प्रदेशातील भयावह घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा भागात एका दिव्यांगाची दाम्पत्याने बेदम मारहाण केली आहे. जेवर भागातील ही घटना असून याचा व्हिडीओ चित्रीत करण्यात आला आहे. मारहाण करणारे दोघेजण हे दिव्यांग व्यक्तीचे नातेवाईक असल्याचं कळालं आहे. दिव्यांग माणसाने केलेल्या तक्रारीच्या आधारे जुगेंद्र आणि त्याच्या बायकोला अटक करण्यात आली आहे.

27 मार्च रोजी गजेंद्र याला मारहाण करण्यात आली होती. आरोपी जुगेंद्र याने त्याची शाळा गजेंद्रला चालवण्यासाठी दिली होती. गेली 2 वर्ष लॉकडाऊनमुळे शाळा बंद होती. यामुळे जुगेंद्रने शाळा भाड्याने दिली होती. यावरून जुगेंद्र आणि गजेंद्र यांच्यात भांडण झालं होतं. भांडण विकोपाला गेल्याने जुगेंद्र आणि त्याच्या बायकोने मिळून गजेंद्रला बेदम मारहाण केली. या दोघांनी गजेंद्रच्या स्कूटरचीही तोडफोड केली.

सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून युवा काँग्रेस अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.