
माकडाला आपण इकडून तिकडे उडय़ा मारताना पाहिलेय. कधी वस्तूंचे नुकसान करताना तर कधी कुणाच्या खोडय़ा काढतानादेखील पाहिलंय. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एका माकडाचा व्हिडिओ पाहून ‘बडे काम का बंदर’ अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत. याचं कारणही तसंच आहे. व्हिडिओत दिसणारे माकड चक्क चहाच्या टपरीवर भांडी घासताना दिसतेय तेदेखील कसलेही नुकसान न करता. माकडाला भांडी घासताना पाहण्यासाठी टपरीसमोर गर्दी झाली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

























































