
>>शेफ विष्णू मनोहर
साहित्य – 300 ग्रॅम पापलेट, मीठ चवीनुसार, 7-8 हिरव्या मिरच्या, पांव वाटीं कोथिंबीर, 10-12 पालकाची पाने, 2 चमचे पातीचा लसूण, पाव वाटी पातीचा कांदा, 4 चमचे पुदिना, पाव वाटी कोथिंबीर.
कृती – पापलेटचे तुकडे स्वच्छ करून त्याला मीठ लावून ठेवा. 7-8 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 10-12 पालकाची पाने, पातीचा लसूण, पातीचा कांदा, थोडे मीठ घालून एकत्र वाटून घ्या. नंतर या मसाल्यात पापलेटचे तुकडे तुकडे बुडवून ठेवा व तव्यावर मसाल्यासोबत तेल टाकून शेलो फ्राय करा. सर्व्ह करतेवेळी बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबिरीचे मिश्रण भरपूर घालून सर्व्ह करा.



























































