तलाक तलाक तलाक! लग्नाच्या 24 तासात हुंड्यापायी नवऱ्याने घेतला काडीमोड

28

सामना ऑनलाईन । लखनौ

हुंडा मिळाला नाही म्हणून एका मुस्लीम तरुणाने लग्नाच्या 24 तासांच्या आत तिहेरी तलाक देऊन लग्न मोडलं आहे. उत्तर प्रदेशमधल्या बाराबंकी येथे ही घटना घडली.

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, 14 जुलै रोजी येथील दोन मुस्लीम कुटुंबात विवाह सोहळा संपन्न झाला. पण, विवाहात नवऱ्या मुलाकडून मोटर बाईक आणि अन्य ऐवजांची मागणी करण्यात आली होती. पण, लग्नानंतर या सगळ्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन देऊन हा निकाह पार पडला. मात्र, जेव्हा नवऱ्या मुलाने अधिक हट्ट धरला तेव्हा आपण या मागण्या पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचं नवऱ्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं. त्यामुळे चिडलेल्या नवऱ्याने तलाक तलाक तलाक म्हणत काडीमोड घेतला. वधुपक्षाने नवऱ्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या