Parliament Attack – संसदेवर हल्ला करण्याची पन्नूने दिली होती धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने गेल्या मंगळवारी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी हिंदुस्थानविरोधात एक वक्तव्य केले होते. 13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याची आठवण करून देणारा व्हिडीओ पन्नू याने प्रसिद्ध करत त्याने हिंदुस्थानला धमकी दिली होती.

2001 च्या संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूचे पोस्टर झळकावत आणि ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’ असे शीर्षकही असलेला व्हिडीओ पन्नूने प्रसिद्ध केला होता. या व्हिडीओ पोस्ट करत पन्नूने धमकी दिली होती की की, हिंदुस्तानी एजन्सींनी माझ्या हत्येचा कट रचला होता जो अयशस्वी झाला. याला उत्तर देण्यासाठी मी 13 डिसेंबरला संसदभवनावर हल्ला करणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या K-2 (काश्मीर-खलिस्तान) डेस्कने पन्नूला हिंदुस्तान विरोधी विधाने करण्याचा अजेंडा सुरू ठेवण्यास सांगितले आहे. अफझल गुरूचे नाव घेऊन कश्मिरी दहशतवाद्यांचे आणि काश्मीर हे पाकिस्तानचेच आहे याचे समर्थन करण्यासही पन्नूला पाकिस्तानने सांगितल्याचे कळते आहे. पन्नूचा हा व्हिडीओ समोर आल्यामुळे सुरक्षायंत्रणा अधिक सतर्क झाल्या होत्या. पन्नूच्या या धमकीचा आणि संसदेत बुधवारी (13 डिसेंबर) झालेल्या घुसखोरीचा काही संबंध आहे का याची चौकशी सध्या सुरू आहे.